शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

सांगलीत होणार २०० कोटींचे सहकारी रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:07 IST

सांगली : प्राथमिक शिक्षकांच्या पुढाकाराने सुमारे २०० कोटी रुपये खर्चाचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालय या नावाने जिल्हा उपनिबंधकांनी नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच रुग्णालयाचे प्रवर्तक शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे रुग्णालय उभारणीतील पहिला टप्पा गाठला असून सर्व अडचणींवर मात ...

सांगली : प्राथमिक शिक्षकांच्या पुढाकाराने सुमारे २०० कोटी रुपये खर्चाचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालय या नावाने जिल्हा उपनिबंधकांनी नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच रुग्णालयाचे प्रवर्तक शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे रुग्णालय उभारणीतील पहिला टप्पा गाठला असून सर्व अडचणींवर मात करून रुग्णालयाची उभारणी करू, असे मिरजकर यांनी सांगितले.शिक्षक बँकेच्या एका कार्यक्रमात पाच ते सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सहकारी रुग्णालयाची संकल्पना मांडली होती. शिक्षक बँकेतील सत्ताधारी शिक्षक समितीने रुग्णालयासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली. त्यानुसार भागभांडवल व सभासद नोंदणीला सुरूवात करण्यात आली. सहकारी तत्त्वावरील या रुग्णालयासाठी आतापर्यंत ४० लाखापेक्षा अधिक भागभांडवल जमा झाले आहे, तर ४५२ सभासदांची नोंदणी झाली आहे. सुमारे २०० कोटीचे रुग्णालय उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या सहकारी रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालय असे नाव देण्यात आले असून, जिल्हा उपनिबंधकांकडे नोंदणीसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधकांनी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे.याबाबत प्रवर्तक मिरजकर म्हणाले की, जिल्ह्यातील संघटित शिक्षकांकडून सामाजिक कार्य व्हावे, या उद्देशाने पालकमंत्री देशमुख यांनी सहकारी रुग्णालयाची संकल्पना मांडली होती. त्याला आता मूर्त स्वरुप येत आहे. जिल्ह्यातील वंचित, गोरगरिबांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. तसेच सभासदांसाठीही आरोग्य सेवेत सवलत दिली जाईल. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांची भेट घेतली. त्यांनीही शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किरण गायकवाड, संचालक रागिणी सतीश पाटील, महेश कनुंजे, सचिव शशिकांत भागवत, समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, बँकेचे अध्यक्ष महादेव माळी, मुसा तांबोळी उपस्थित होते.जागेसंदर्भात महसूलमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा!मिरजकर म्हणाले की, रुग्णालयाच्या जागेसंदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा प्रशासनाशी आम्ही चर्चा करणार आहोत. राज्य शासन या रुग्णालयाबाबत सकारात्मक असल्याने निश्चित रुग्णालयाची उभारणी पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.